Wednesday, November 28, 2018

जमावड़ा

जमावडा निश्चितच आंदोलन उभे करू शकत नाही, पण आंदोलनाची किंवा समोरच्या प्रक्रियेची नांदी जरूर उभी करण्यास मदत करतो. जमावडा उत्सव साजरा करण्या साठी आहे का मग एखादी ऐतिहासिक घटना साजरी करण्या साठी हा फरक जर आपल्या बुद्धीला पटला तर त्या जमावड्याच रूपांतर आंदोलनात करण्यास आपली विद्वात्ता निश्चितच आपण कामी आणू शकतो. जमावडा दोन व्यक्तीचा असो किंवा 2000 लोकांचा फरक निश्चितच पडतो, गरज असते त्या जमावड्याला योग्य दिशा देण्याची.
तथागत बुद्धासमोर बसलेल्या त्या प्रथम शिष्यानीच संघाची निर्मिती झाली आणि धम्म साऱ्या जगात पोचला, टेनिस कोर्ट वर जमा झालेल्या त्यास 4 मित्रांच्या जमावड्यानेच रशियन क्रांती उभी केली, चवदार तलावाचा सत्याग्रह त्याच जमावड्याने उभा केला आणि 14 ऑक्टोबर धम्म क्रांतीत देखील तोच जमावडा होता हे आपण समजले पाहिजे.
समाज एकत्रित होणं हा आनंदाचा भाग आहे त्याला आपण हिनवन कितपत योग्य आहे हे आपल्या विवेकवर अवलंबून आहे, शक्य असेल तर त्या जमावड्यात सामील होऊन एकत्रित असण्याचा, समाजाचा एक अभिन्न भाग असण्याचा आनंद लुटावा.

एम जे

No comments:

Post a Comment