सूर्याला चमकण्या साठी जशी
दिवसाची गरज असते, चंद्राला चमकण्या साठी जशी रात्रीची गरज असते, क्षत्रियाची ओळख
व्हायला त्याच्या शूरत्वाची गरज लागते आणि ब्राह्मनाला त्याचे ब्राह्मणत्व सिद्ध
करण्यासठी सदाचाराची गरज लागते..पण बुद्ध पुरुषाला चमकण्या साठी ना दिवसाची गरज
लागते ना रात्रीची...त्यांच्या बुद्धीच्या प्रकाशाने बुद्ध पुरष दिवस रात्र, ३६५
दिवस सतत ह्या विश्वाला प्रकाशमान करत असतात... ह्या जगाला मानवतेचा संदेश देणारे,
समता,स्वातंत्र्य,न्याय आणि बंधूता ह्या सूत्राचे जनक, ह्या जगाला लोकशाहीची ओळख
करून देणारे पहिले महावैग्यानिक तथागत बुद्ध....
तथागत बुद्धांचा मानवतावादी
विचार, फक्त भारतातच नव्हे तर अखंड विश्वामध्ये पोचवणारे, “सब्बदान धम्मदान
जीनाती”, सगळ्या दानामध्ये जर कोणते दान श्रेष्ठ असेल तर ते धम्मासाठी केलेलं दान
होय. ह्या सूत्राला आपल्या जीवनात उतरून आपली मुल महेंद्र आणि संघमित्राला
धम्मासाठी दान देणारे, ह्या जगाचे सर्वश्रेष्ठ सम्राट, प्रियदर्शी सम्राट अशोक...
महाभारताला सुद्धा ज्याच्या
कर्तुत्वाची दखल घेवून “कर्ण” ह्या पात्राची निर्मिती करण्यास भाग पाडणारा,
पुष्यमित्र सुन्गाच्या प्रतिक्रांती नंतर बुद्ध धम्माला पुन्हा भारतात प्रस्थापित
करणारा बौद्ध सम्राट शिलसुर्य सम्राट हर्षवर्धन....
आणि हजारो वर्षे जी माणसे
गुलामीच्या साखळ्यात बांधली गेली होती, ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क ह्या व्यवस्थेने हिरावून घेतला होता अशा
सर्व दिन-दलित,शोषित आणि पिढीताना गुलामीच्या साखळ्यातून मुक्त करणारे, आम्हा
सर्वांचे मुक्तिदाते, विश्व क्रांतीच्या इतिहासाच्या अत्युच्च शिखरावर सूर्यासारखे
चमकणारे ह्या आधुनिक विश्वाचे अतिप्रगत बुद्ध प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्या सर्व
आदी प्रेरणांना माझे नमन...!
व तसेच ह्या सर्व
महापुरुषांना जीवनभर साथ देणाऱ्या माता यशोधरा, माता सुभंद्रांगी, माता विदिशा आणि
जिच्या त्यागाचे मोजमाप करण्यास शब्दही अपुरे पडतील अशी आमची आई रमाई यांच्याही
त्यागमय जीवनाला माझे अभिवादन..!
मंचकावर उपस्थित सर्व
मान्यवर आणि माझा समोर बसलेले माझे सर्व भाऊ बहिणींना माझा क्रांतिकारी जय भीम...
मी खास करून ह्या युवा
अधिवेशनाचे आयोजक FAM टीमचे मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी मला तुमच्या समोर उभ
राहून काही बोलण्याच्या लायक समजल.
मित्रहो...हा जो विषय मला
देण्यात आला आहे, Education…And Indian Constitution, हा खरच खूप important विषय
आणि काळाची गरज असल्या सारखा विषय आहे. बऱ्याच लोकांच्या डोक्यात "Education” ह्या शब्दाबद्दल गोंधळ असतो. काहींच्या मते
"Education” म्हणजे एखादी डिग्री, एखादी शैक्षणिक उपाधी,
ज्याच्या मूळ त्यांची ओळख होते...ज्याच्या मूळ आपल्याला जॉब्स मिळतात. पण माझा मते
"Education” आणि Literacy हे दोन वेगळे शब्द आणि अर्थ
आहेत. Being educated is different from Being Literate. Literacy तुम्हाला job आणि
career देते पण Education हे आपल्याला सत्य आणि असत्या ह्यातील फरक काय
असतो हे समजण्यास मदत करते. Education teaches us the sense of right
and wrong !
काय ह्या देशाची वर्तमान
परिस्थितीत शिक्षण व्यवस्था आपल्याला सत्य आणि असत्या ह्यातील फरक सांगत आहे ? काय
वर्तमान शिक्षण आपल्याला Impartial/Unbiased शिक्षण देत आहे ? काय आजची
शिक्षण प्रणाली ह्या देशातील युवकांना विश्वाला बघण्याचा वैज्ञानिक आणि तुलनात्मक
दृष्टीकोन शिकवत आहे ? माझे उत्तर आहे “नाही...!”
वर्तमान शिक्षण प्रणाली
ह्या देशात आधुनिक मानसिक गुलामी लादण्याच्या कामात लागलेली आहे असे माझे ठाम मत
आहे. जितके जास्त शिक्षण, तीतका जास्त मासिक गुलाम...जितके जास्त शिक्षण, तितकाच
जास्त गर्व, धाक आणि हुंड्याची demand. सर्व काही mechanical करून टाकलंय. सर्व
बाजार करून टाकलाय !
Dr.बाबसाहेब आंबेडकर मात्र
शिक्षणाला एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत होते. त्यांच्या मते शिक्षण कोणत्याही
देशाचे प्रोब्लेम्स सोडवू शकते. पण ते शिक्षण कसे असावे व कोणत्या वर्गाला भेटावे
ह्या बद्दल मात्र बाबासाहेब अतिशय काळजीपूर्वक आहेत.
Dr.बाबासाहेब आंबेडकर
शिक्षणाचे महत्व सांगतांना आपल्या एका भाषणात म्हणतात “Can education destroy caste? The
answer is ‘Yes’ as well as ‘No’. If education is given as it is to-day,
education can have no effect on caste. It will remain as it will be. The
glaring example of it is the Brahmin Caste. Cent percent of it is educated,
nay; majority of it is highly educated. Yet not one Brahmin has shown himself
to be against caste. In fact an educated person belonging to the higher caste
is more interested after his education to retain the Caste System than when he
was not educated. For education gives him an additional interest in the
retention of the Caste System namely by opening additional opportunity of
getting a bigger job.
From this point
of view, education is not helpful as means to dissolve caste. So far is the
negative side of education. But education may be solvent if it is applied to
the lower strata of the Indian Society. It would raise their spirit of
rebellion. In their present state of ignorance they are the supporters of the
Caste System. Once their eyes are opened they will be ready to fight the Caste
System.”
बाबासाहेबांच्या मते,
शिक्षण ह्या देशातील जातीवाद नष्ट करू शकते, किंबहुना ते शिक्षण देशातील शोषितांना
दिल्या गेल तर...कारण सुशिक्षित शोषित तरुण अन्याया विरुद्ध बंड करू शकतील. शिक्षण
त्यांना असे करण्यास प्रवृत्त करेल, प्रेरणा देईल.
आणि म्हणूनच बाबासाहेब
आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समजून भारतीय संविधानात अनेक तरतुदी समाविष्ट
केल्यात. Article 15, 21A,
28,30,38,39,41,45,46,47 हे काही articles आहेत जे
मुख्यता शिक्षणा बाबत बोलतात. पण आपण अस बघतो कि ह्या व्यवस्थेने देशातील
शिक्षण व्यवस्थेचा व्यापार चालवलाय. एकीकडे भारतीय संविधानाचे
Art.42 आणि Art.21A अंतर्गत १४ वर्षाच्या वायोगटा पर्यंत सर्वाना मोफत शिक्षणाची गोष्ट करते आणि ही व्यवस्था सरकारी शाळा बंद करण्याच्या मागे आहे. आणि ज्या काही सरकारी शाळा चालू आहेत, त्या सर्व शाळेमधील शिक्षणाचे स्थर अतिशय हीन दर्जाचे करून टाकण्याचे काम करत आहेत.
Art.42 आणि Art.21A अंतर्गत १४ वर्षाच्या वायोगटा पर्यंत सर्वाना मोफत शिक्षणाची गोष्ट करते आणि ही व्यवस्था सरकारी शाळा बंद करण्याच्या मागे आहे. आणि ज्या काही सरकारी शाळा चालू आहेत, त्या सर्व शाळेमधील शिक्षणाचे स्थर अतिशय हीन दर्जाचे करून टाकण्याचे काम करत आहेत.
या मध्ये एक मोठ षडयंत्रच
आहे असे माझे ठाम मत आहे. देशाचे ७०% पेक्षा जास्त लोक Middle Class, Lower Middle
Class आणि गरीब आहेत. आणि अधिकांश कुटुंबांचे मूल/मुली हे सरकारी शाळेत शिकतात.
ह्या व्यवस्थेला हे माहित आहे कि जर एक भीमराव आंबेडकर शाळेच्या बाहेर बसून सुधा
ह्या देशाचे संविधान लिहू शकतो, ह्या देशाला एक नवीन दिशा देवू शकतो, हजारो
वर्षापासून चालत आलेल्या गुलामगिरीला नष्ट करू शकतो तर मग ह्या देशातील ७०%
कुटुंबातील मूलाना जर श्रेष्ठ शिक्षण मिळाले तर प्रत्तेक घरातून किती आंबेडकर तयार
होतील ! आणि म्हणूनच ह्या व्यवस्थेने सरकारी शाळेतील शिक्षणाचे स्थर पडून टाकण्याचे
मोठे षडयंत्र चालवले आहे. पूर्ण शिक्षण खाजगी करून टाकले आहे. जिथे गरीब घरची मूल
प्रवेश घेऊ शकत नाहीत, आणि खाजगी शाळेत शिकणाऱ्या मुलांसोबत compete करू शकत
नाहीत.
मित्रहो, भारत हा देश
जगातील सर्वात जास्त असुशिक्तांचा देश आहे. भारतातील 287 मिलियन लोकसंख्या हि
असुशिक्षित आहे. हे जगाच्या लोकसंखेच्या ३७% भाग आहे हे आपल्याला माहित असावे.
भारतात 4% मूल शाळेत प्रवेश पण घेत नाहीत. 58% मूल त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण
करत नाहीत आणि 90% मुल त्यांचे माध्यमिक शिक्षण सुधा पूर्ण करु शकत नाहीत. UNESCO
च्या रिपोर्ट वर जर आपण विश्वास ठेवावा तर भारतातील फक्त 10% मूल कॉलेज चे शिक्षण
घेतात. त्यामध्ये गरीब घरातील मुलांचे प्रमाण अतिशय क्षुल्लक.
CIA World Factbook च्या अनुसार जगाच्या 775
मिलियन लोकसंखेतून 75% असुशिक्षित लोक 10 देशात राहतात. ह्या देशात भारताचा सर्वात
मोठा भाग आहे. भारता शिवाय चीन, पाकिस्तान, बांगलादेश, नायजेरिया, इथोपिया,
इजिप्त, ब्राझील, इंडोनेशिया आणि डेमोक्राटीक रिपब्लीक ऑफ काँगो हे देश आहेत. किती
शर्मेची आणि लाजिरवाणी बाब आहे हि आपल्यासाठी ? ज्या देशाने ह्या जगाला ज्ञानाची
भिक दिली...ज्या देशाने ह्या विश्वाला नालंदा,तक्षशीला,विक्रमशीला,ओदन्तपुरी
सारख्या जगतंमान्य विश्वविध्यालय दिले, ज्या देशामध्ये जगाच्या कानाकोपर्यातून
शिक्षण घेण्यासाठी विदेशातून हजारो प्रवासी यायचे, त्याच देशाची मुल असुशिक्षित
राहावी हि किती शर्मेची गोष्ट आहे...काय दिल ह्या हिंदू/ब्राह्मणी व्यवस्थेने ह्या
देशाला ? असमानता...दारिद्र...धर्मांधता...गरिबी..!
6 करोड लहान मूल बाल
कार्मिकीच्या गुलामीत ढकलल्या गेली आहेत, प्रत्तेक ठिकाणी आपल्याला लहान मुलांचे
मानसिक आणि शारीरिक शोषण होताना दिसते. रस्त्यावर हजारो मुल भिक मागण्यासाठी मजबूर
केली जातात. 80% बाल कार्मिक हे खेड्या गावात पाहायला भेटतात. ह्यात दलित आणि
मुस्लीम मुलांचे प्रमाण जास्त असते हे सूर्य सत्य आहे. ह्या सर्व मुलांना शिक्षण
नाही...उचित मार्गदर्शन नाही...जगण्याची आशा नाही...भविष्य नाही...एकीकडे भारताचे
संविधान देशांच्या नागरिकांना सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक समानतेची गोष्ट करते आणि
दुसरी कडे हि व्यवस्था ह्या देशांच्या नागरिकांवर आधुनिक गुलामगिरी लादत आहे.
मित्रहो, आपल्याला एक गोष्ट
समजून घ्यावी लागेल....आपण ह्या व्यवस्थे कडून काही अपेक्षित करणे हे आता कालबाह्य
झाले आहे. हि सरकार देशातील गरीब, दलित, शोषित,पिढीतांची सरकार राहिलीच नाही. हि
व्यवस्था आणि सरकार पूर्णपणे कार्पोरेट सरकार झालेली आहे. आणि अशा व्यवस्थेकडून
आपण काही अपेक्षित करणे हे निश्चितच चुकीचे आहे. कारण, फक्त शैक्षणिक व्यवस्थाच
नव्हे तर, Healthcare, Medicine, Science, Politics, Industries,
Service Sectors आणि इतर सर्व क्षेत्र त्यांनी त्यांच्या खिशात ठेवले आहेत.
त्यांना ह्या देशात पुन्हा गुलामी लादायची आहे आणि ते त्या कामावर अग्रसर झाले
आहेत हे आपण खुल्या डोळ्यांनी बघू शकतो.
हे सर्व आपल्या डोळ्या समोर
चालत असताना, प्रत्यक्षात पाहत असताना आपण काय करू शकतो हा मोठा प्रश्न आपल्या
समोर उभा आहे. आणि त्या पेक्षा पण मोठा प्रश्न म्हणजे, काय आपण ह्या व्यवस्थेला
चालेंज करू शकतो ? काय आपण त्यांच्या विरुद्ध एक पर्याय म्हणून ह्या देशाला काही
देवू शकतो..? उत्तर हो आणि नाही दोन्हीतही आहे. जर आपण आपली जिम्मेदारी समजाप्रती,
देशाप्रती निस्वार्थ पणे पार पडली तर निश्चितच आपण एक पर्याय म्हणून उभ टाकू शकतो.
आणि जर आपण आपल्या जिम्मेदारी पासून पळ काढून माझी बायको, माझे मुल, माझी नोकरी
म्हणून आयुष्य व्यर्थ केल तर काहीच होणार नाही...
the choice is totally ours…!
मित्रहो, आपल्या समाजात
सर्वात जास्त नोकरदार हे शिक्षक वृत्तीत आहेत. खूप सारे युवक D.ed, B.ed करून वेगवेगळ्या
शाळेत,संस्थेत,कॉलेज आणि विश्वविध्यालयात शिकवत आहेत. आणि त्यामुळ माझ्या मते,
आपला शिक्षक वर्ग हे जास्त महत्वपूर्ण रोल निभावू शकतो असे मला वाटते. आपल्याला
माहित आहे कि ह्या देशातील शैक्षणिक व्यवस्था कशी झाली आहे. आपल्याला हे हि माहित
आहे कि अश्या अवस्थेत सरकारी शाळेतून एखादा दर्जेदार विद्यार्थी समोर येण अतिशय
कठीण झालय. अशा परीस्थित तो मुलगा जगतीकारानाच्या ह्या competative परिस्थिती
मध्ये कसे चालेंज उभे करणार आणि कसे आपले भविष उज्वल बनवनार हा मोठा प्रश्न आपल्या
समोर उभा आहे.
माज्या मते आपल्या समाजातील
शिक्षण मंडळीने आता समोर आले पाहिजे. गावागावात, शहरात, गल्ली-गल्लीत, दर्जेदार
शिक्षण देण्यासाठी क्लासेस सुरु करावेत. Competative शिक्षण, Technical शिक्षण,
Academic मार्गदर्शन आणि अशा सर्व विभागाचे शिक्षण/मार्गदर्शन देण्याच काम जर
आपल्या शिक्षक मित्रांनी युद्ध स्थरावर सुरु केल तर माझा हा आशावाद आहे कि आपण एक
अतिशय कर्तबगार पिढी निर्माण करू शकू आणि ह्या देशाला एक अशी पिढी देण्यात यशस्वी
होऊ जेणेकरून ती पिढी समाजाची,देशाची सेवा करेल...! आणि आपल्याला हे करावेच लागेल.
काळाची गरज आहे ती...आपण जर आपली जिम्मेदारी पार नाही पडली तर येणाऱ्या पिढ्यांना
आपण उत्तरदायी ठरू...!
मित्रहो...वेळ बदलली आहे,
काळ बदललाय. ह्या व्यवस्थेने त्यांची strategies,
plannings आणि Weapons सर्व काही बदललंय. आपल्याला पण बदलाव लागणार आहे, काळानुरूप
आपल्या strategies,
planning’s आणि Weapons बदलावे लागणार आहे. शत्रू ताकतवर नाही, तो कपटी आहे, नीच आहे.
आणि आपल्या जवळ आहेत तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर...! विजय निश्चितच आपला
होईल जर आपण निस्वार्थपणे आंबेडकरी चळवळीसाठी सर्वस्व त्यागून टाकायला तयार
राहू...मानवतेच्या रक्षणासाठी जे युद्ध तथागत बुद्धाचे सुरु केले होते, त्या
युद्धाला आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. इतके बोलून मी इथेच थांबतो...जय भीम !
Adv
Mahendra Jadhav
पुणे येथे दिलेले भाषण
दि.५.३.२०१५